उघडयावर शौचास जातांना आढळल्यास फौजदारी व दंडात्मक स्वरुपाची कारवाई होणार
अमळनेर : तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्याची मुदत १५ डिसेंबर २०१९ आहे. कुठल्याही लाभार्थ्याला ता.३१ डिसेंबर २०१९ नंतर शौचालयासाठी अनुदान मिळणार नाही. यामुळे बेसलाईन व एल.ओ.बी अंतर्गत नाव असणा-या लाभार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीत तारीख १५ डिसेंबर २०१९ पर्यंत शौचालयाचे बांधकाम पुर्ण करुन अनुदानासाठी प्रस्ताव ग्रामसेवक मार्फत पंचायत समिती, अमळनेर कार्यालयातील स्वच्छ भारत मिशन कक्षात तात्काळ जमा करावेत. ज्या लाभार्थ्यांचे नाव एल.ओ.बी किंवा बेसलाइन सर्वेक्षणामध्ये नाही अशा लाभार्थ्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे.
सर्व सार्वजनिक शौचालय हे वापरण्यासाठी योग्य स्वरुपात राहतील याची सरपंच व ग्रामसेवक यांनी दक्षता घ्यावी. तारीख १ डिसेंबर २०१९ नंतर उघडयावर शौचाला जातांना कोणी आढळल्यास त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणे प्रकरणी फौजदारी व दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. सदर इसमाने स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शौचालयाचा लाभ घेतलेला असल्यास त्याच्याकडुन शौचालय अनुदानाची रक्कम वसुल करण्यात येईल. अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी एका पत्रकाद्वारे जनतेला आवाहन केले आहे.