समता शिक्षक परिषदेमार्फत जिल्ह्यातील शिक्षक ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जळगाव : ‘ वैज्ञानिक जाणीवा वाढून समाज उन्नत करायचे कार्य आम्ही केले पाहिजे. शिक्षणाने जाणीवा निर्माण झाल्या पाहिजेत ‘ असे प्रतिपादन ॲड. मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले. समता शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्या ‘वैज्ञानिक जाणिवा’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष सुर्यकांत गरुड होते. विचार मंचावर जिल्हा उप शिक्षणाधिकारी डॉ.डी.एम.देवांग, उप शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, बी.डी.धाडी, माजी उप शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, संघटनेचे माध्यमिक विभागाचे अध्यक्ष भरत शिरसाठ, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड, राज्य महासचिव श्यामकुमार जाधव, धनराज मोतीराय, विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला म.ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूूजन करण्यात आले. आर.आर.विद्यालयाचे क्षिरसागर सरांनी प्रार्थना व स्वागत गीत सादर केले. सरचिटणीस अजय भामरे यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला.
ॲड. दाभोळकर पुढे म्हणाल्या की, समाज ज्या वेळेस अंधश्रद्धा, जातीव्यवस्था व प्रामाण्यवादात अडकलेला होता, तेव्हा ज्योतीराव फुलेंनी समाजाला व्यवस्थेविरुद्ध प्रश्न विचारायला शिकवले. ‘असे का ?’ या प्रश्नाने तत्कालीन व्यवस्था हादरुन गेली. विवेकी विचार हा शाश्वत असून जोतीरावांनी त्याच विवेकी विचारावर आधारीत समाजाची बांधणी केली. ज्योतीरावांचा हाच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेत पेरला. युरोपात क्रांती झाल्यावर बायबल बद्दल बोलण्याचे धाडस झाले. महाराष्ट्रात महात्मा फुलेंनी समाजात बंड करून नितीमूल्ये, संस्कार व शिक्षणाची ज्योत पेटवली. समाजाने विज्ञानाची सृष्टी घेतली परंतु दृष्टी घेतलेली नाही. अजूनही विवेक बुद्धी आम्ही संपूर्णतः स्विकारली नाही. डॉ. बाबासाहेबांनी सर्वांसाठी हिंदू कोड बिल कायदे करून स्रीला गुलामीतून मुक्त केले. प्रत्येक गोष्टीतून कार्यकारण भाव घेतला पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी सत्य स्विकारले, खोट्याचा विरोध केला. हा विवेकी विचार संस्कारांतून प्रत्येक पिढीत संक्रमित व्हावा, असेही स्पष्ट केले. जिल्हाभरातून चारशेच्या वर शिक्षकांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद आठवले यांनी ‘ज्योतीराव फुले व शिक्षण’ या विषयावर, संघटनेचे माध्यमिक विभागाचे अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी ‘ नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर, आपले विचार व्यक्त केले. सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांचीही भाषणे झाली. मुक्ता दाभोळकर यांच्या कार्याचा संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांचा समता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. समता शिक्षक परिषदेत बहुमूल्य योगदानाबद्दल डी.एम.मोतीराय यांचा गौरव करण्यात आला. सन्मानपत्रांचे वाचन प्रभावती बावस्कर, राहुल सोनवणे व युवराज सोनवणे यांनी केले. याप्रसंगी श्रीमती शितल जडे यांच्या ‘कलेक्शन आँफ गोल्डन पोयम्स’ या इंग्रजी कविता संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.
समता शिक्षक परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक मिळून ३० शिक्षकांना ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात, माध्यमिकचे पुरस्कारार्थी १) सुनील प्रभाकर वाघ, गं.स.हायस्कूल, अमळनेर २) सपना महेश रावलानी, सिंधी हायस्कूल कंवररामनगर, जळगाव ३) अविनाश समरसिंग कुमावत, शा. शि. पाटील माध्यमिक विद्यामंदिर, चहार्डी, ता. चोपडा ४) अमृतकार प्रमोद नरहर, राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव ५) विनोद बाबूलाल सपकाळे, डी. के. पाटील माध्यमिक विद्यालय आडगाव, ता. एरंडोल ६) सुदेशकुमार दत्तोपंत दराडे, माध्यमिक विद्यालय, तळेगाव ७) सौ.प्रतिभा रुपेशकुमार पाटील, माध्यमिक विद्यालय मेहरुण, जळगाव ८) अविनाश राजू घुगे, स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, कुसुंबा ९) सौ.सुनिता कोमलसिंग निकुंभ, भारत विद्यालय न्हावी, ता.यावल १०) श्री गणेश दत्तात्रय बच्छाव, थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद ११) पंकज लक्ष्मण पाटील, प्रताप माध्यमिक विद्यालय, वडगाव बु।। ता.भडगाव १२) ज्ञानेश्वर भगवान पाटील, श्रीमंत डी.के.पवार माध्यमिक विद्यालय निंभोरी, ता.पाचोरा १३) शंकर रंगनाथ भामेरे, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, पहूर, ता.जामनेर १४) सौ. रंजना विनोद महाजन, जे.ई.हायस्कूू,ल मुक्ताईनगर १५) यशवंत तुळशीराम माळी, एन.एच.राका हायस्कूल, बोदवड १६) हितेंद्र देवराम धांडे, भुसावळ हायस्कूल, भुसावळ १७) अर्जुन जयराम सोळुंके, माध्यमिक विद्यालय, विवरे ता.रावेर. तर, प्राथमिकचे पुरस्कारार्थी १) संदीप निळकंठ पाटील, जि.प प्राथ.शाळा, कानळदा, जि.जळगाव २) रफिक खान मोहम्मद खान, मिल्लत प्रायमरी स्कूल मेहरूण, जळगाव ३) सुरेश विक्रम सोनवणे, जि.प.प्राथमिक शाळा सुंदरनगर, चाळीसगाव ४) भाऊसाहेब बंकट जगताप, व्ही.एच.पटेल प्राथ. विदयालय, चाळीसगाव ५) गोविंद हैबतराव निकम, राष्ट्रीय प्राथ.विदयालय, चाळीसगाव ६) विशाल नानाराव धांडे, जि.प.प्राथ.शाळा, तारखेडे ता.पाचोरा ७) नलिनी सुरेंद्र शिरसाठ, जि.प .उच्च प्राथ.शाळाा, म्हसवे ता.पारोळा ८) दिनेश रमेश मोरे, जि.प.प्राथ. कन्या शाळा, मारवड, ता.अमळनेर ९) चंद्रकांत भिला पाटील, जि.प.प्राथ.शाळा, शिरूड ता. अमळनेर १०) योगेश सुभाष शिंपी, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, वरखेड दिगर, ता.भडगाव ११) सुरेश पुंडलिक कदम, जि.प.मराठी शाळा, सातगाव डोंगरी ता.पाचोरा १२) सुनंदा ब्रिजलाल भामरे, जि .प.प्राथ.शाळा पिंपळकोठा, एरंडोल १३) गणेश रमेश लाड, जि.प.प्राथ. शाळा सावरला, जामनेर यांना पुरस्कार मिळाला आहे
स्वागत सोहळ्याचे संचलन शितल जडे व रणजीत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचंं प्रास्ताविक प्रभावती बावस्कर यांनी केलं. पुरस्कारांचं वाचन महीला छाया बैसाणे, रणजीत सोनवणे व अजय भामरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब सोनवणे व टी.बी.पांढरे यांनी केले. आभार बी.एन.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रविण केदार, सौ.अश्विनी कोळी, युवराज सोनवणे, प्रविण मोरे, सौ.संगिता सोनवणे, मनोज नन्नवरे, प्रकाश तामस्वरे, चिंतामण जाधव, गोविंद वंजारी आदींनी परिश्रम घेतले.