डॉ. प्रियंका रेड्डी वरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज अमळनेर शहरातून निषेध रॅली

अमळनेर : शहरातून आज (ता.२) रोजी हैदराबाद येथील पशु चिकीत्सक डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून सायंकाळी ५ वाजेनंतर निषेध रॅली काढण्यात येणार आहे. यासाठी ठीक ५ वाजता नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हैदराबाद येथे पशु चिकीत्सक डॉ. प्रियंका रेड्डी हिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार करून निर्दयीपणे खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना अत्यंत लाजवणारी असून महिला व मुलींवर होणाऱ्या ह्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी व आरोपींना कठोर शासन मिळावे या करिता आज ता.२ रोजी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अमळनेरातील सर्व संवेदनशील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने निषेध रॅलीत उपस्थित राहून डॉ. प्रियंकाला श्रध्दांजली अर्पण करण्याकरिता उपस्थित राहावे. सोबत येतांना मेणबत्ती घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!