
अमळनेर : येथील जी.एस.हायस्कूल मधील आय.एम.ए. हॉलमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे आज रोजी वीज ग्राहकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा महावितरण धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून मकसूदभाई बोहरी होते. याप्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलाबराव पाटील, अमळनेर एम.आय.डी.सी. चेअरमन जगदीशभाऊ चौधरी, अमळनेर महावितरणचे अभियंता कोलते साहेब, देशमुख साहेब, फुरसिंगे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. संघटनेतर्फे यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
वीज ग्राहकांना मार्गदर्शन करताना पवार यांनी आर.एफ. मीटर हे किती बिनचूक आहेत याबाबत माहिती दिली. वीज मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, नवीन उपक्रमांची माहितीही देण्यात आली. तालुक्यातील वीज ग्राहकांनी उपस्थिती नोंदवून आपल्या वीज समस्या मांडल्या. त्या समस्यांना पवार यांनी समर्पक उत्तरे दिली. ग्राहकांकडील आलेल्या लेखी तक्रारी तपासून कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. वीज मंडळात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यात सर्वश्री श्याम पाटील, रवींद्र पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, विनायक भालेराव, लक्ष्मण सांगोरे, भागवत माने व श्रीमती हंसा कुर्वे, संध्या जाधव यांचा समावेश होता. माजी आमदार साहेबराव पाटील, रामभाऊ संदानशिव यांनी कार्यक्रमास भेट दिली.
कार्यक्रमास संघटनेचे तालुकाध्यक्ष मकसूद भाई बोहरी, तालुका संघटक राजेंद्र सुतार, सहसंघटक बापू चौधरी, सचिव विजय शुक्ल, सहसचिव योगेश पाने, महिला आघाडी प्रमुख अँड. भारती अग्रवाल, करुणा सोनार, लता दुसाने, कार्यकारी सदस्य सतीश मुंडके, ताहा बुकवाला, प्रसिद्धीप्रमुख जयंतलाल वानखेडे, ऊर्जा मित्र सुनील वाघ, अनिल घासकडवी, खादिर सादिक, सुरेश पाटील, जितेंद्र चंद्रात्रे, मधुकरराव सोनार, चंद्रकांत लोहार, गणेश चव्हाण, महावितरण अमळनेर विभागाचे लेखाधिकारी अनिल ठाकूर, नगरपरिषदेचे इंजिनियर प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते. अमळनेर दाऊदी बोहरा समाजातर्फे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक विजय शुक्ल यांनी तर पाहुण्यांचा परिचय ऊर्जा मित्र सुनील वाघ यांनी केेेला. सूत्रसंचालन राजेंद्र सुतार यांनी तर आभार प्रदर्शन मकसूदभाई बोहरी यांनी केले.