‘आधार संस्था’ एचआयव्ही आजार व संसर्ग रोखण्यासाठी देतेय ‘आधार’

अमळनेर : येथील आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मागील १५ वर्षापासून एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रणाकरीता तालुक्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांसमवेत हस्तक्षेप प्रकल्पाच्या जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्तींकरीता विहान प्रकल्प तसेच ग्रामिण भागांतील नियंत्रण व प्रतिबंधाकरीता जिल्ह्यातील १०० निवडक मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये लिंक वर्कर प्रकल्प राबवून आधार दिला जात आहे. या विषयी कुठलीही मदत हवी असल्यास आधार संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील यांनी केले आहे.

एक डिसेंबर हा जागतिक एचआयव्ही एड्स नियंत्रण दिन म्हणून पाळला जातो. गेल्या ३३ वर्षापूर्वी १९८६ ला भारतात प्रथम एचआयव्हीचा विषाणू सापडला. त्यानंतर पुढील दोन दशकांमध्ये ह्या विषाणूने देशभर आपले हात पाय पसरवले. अनेक कुटुंब व आयुष्य ह्या संसर्गमुळे उध्वस्त झाले. १५ ते ४९ ह्या  वयोगटातील व्यक्तीला सर्वात जास्त संसर्ग होण्याचे प्रमाण असते. एकूण संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी ८९ % व्यक्तींना हा संसर्ग असुरक्षित शारीरिक संबंधांद्वारे पसरतो. संसर्गचे इतर तीन मार्ग जसे संसर्गित आई कडून बाळाला दूषित रक्ताद्वारे (रक्तसंक्रमणद्वारे ) दूषित सुई द्वारे होणारे एचआयव्ही संसर्गचे प्रमाण नगण्य असून वैद्यकीय प्रयत्नांमुळे ह्या संसर्गवर यशस्वी रित्या नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. १९९२ ला आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण सोसायटी राष्ट्रीय स्तरावर व राज्य नियंत्रण सोसायटी राज्य स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर स्थापन होऊन अनेक अशासकीय संस्थांच्या माध्यमांतून विविध कार्यक्रम राबवून यशस्वीपणे ह्या संक्रमनाचा वेग काबूत ठेवण्यात यश मिळाले आहे. परंतु आजही हा एचआयव्हीचा आजार व संसर्ग पूर्णपणे थांबलेला नाही.

एचआयव्ही ह्या विषाणूंमुळे एड्स या आजाराची लागण होते. हा फक्त वैद्यकीय प्रश्न नसून व्यक्तीच्या वैयक्तिक वर्तन बदलानेच ह्या संसर्गवर आपण यशस्वी नियंत्रण मिळवू शकतो म्हणून हा सामजिक प्रश्न समजला जातो. ज्यावर “समाजच ह्यावर यशस्वी बदल घडवू शकतो ” आपली सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने व्यक्तीने एचआयव्ही एड्स विषयक जास्तीत जास्त माहीती मिळविणे तसेच प्रतिबंधात्मक उपायांचे अनुकरण करणे एचआयव्हीची तपासणी करणे. एचआयव्हीसह जगत असणाऱ्या व्यक्तींना आधार देणे. त्यांची काळजी घेणे. त्यांनी नियमित औषधे घ्यावे म्हणून प्रोत्साहित करणे. समाजातील एचआयव्ही एड्स विषयी कलंक व भेदभावाची भावना कमी करणे. एचआयव्ही संसर्गित  रुग्णांना सन्मानाने वागणूक देणे. हे सगळे बदल आपण समाज म्हणून घडवू शकतो. जळगाव जिल्ह्यातील एआरटी औषधोपचार केंद्रात १२१०७ एचआयव्ही ससर्गित व्यक्तींची नोंदणी असून ज्यातील ६६६५  पुरुष ५०७५ स्त्रिया ७४८ मुले तर १९ तृतीयपंथी आहेत. पैकी, ६२४१ रुग्ण एआरटी औषधे घेतात.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!