आधुनिक युगात अध्यात्म कमी व विज्ञानाची प्रगती जास्त झाली पाहिजे : डॉ. बी. एस. पाटील

अमळनेर : जीवनात काही इप्सित साध्य करण्यासाठी अध्यात्म वापरले जात असेल तर तो विज्ञानाचा पराभव आहे. आधुनिक युगात अध्यात्म कमी व विज्ञानाची प्रगती जास्त झाली पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन हे विज्ञानामुळेच शक्य आहे. विज्ञानाला शाप म्हणून वापरायचे की वरदान म्हणून, हे प्रत्येकाने ठरवावे असे मत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी येथे व्यक्‍त केले. अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलतर्फे झालेल्या ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार शिरीष चौधरी, नोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. जयदीप पाटील, सिनेट सदस्य दिनेश नाईक, डॉ. कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विभागप्रमुख मनिषा चौधरी, प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, स्वामी विवेकानंद स्कूलचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, सी. ए. नीरज अग्रवाल, गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, समन्वयक व शिक्षण विस्तार अधिकारी पी. डी. धनगर, शापोआ अधीक्षक बी. पी. चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, नगरसेवक बाळासाहेब संदानशिव, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एम. ए. पाटील, केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकूळ पाटील, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, साने गुरुजी पतपेढीचे तुषार पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. जे. पाटील, केंद्रप्रमुख राजेंद्रसिंग पाटील, मंगलाताई पाटील, शरद सोनवणे, पी. एस. विंचूरकर, स्वामी विवेकानंद स्कुलचे प्राचार्य गणेश मितपल्लीवार, रवींद्र चौधरी, नवनीत राजपूत, नवनीत सपकाळे, शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले की, कृत्रिम बुद्धीमत्ता वापरण्यास सुरवात झाली तर माणूस भावनाशून्य होईल. अध्यात्मामुळे प्रगती नाही केवळ आत्मिक समाधान मिळते. माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनात भाग घेणारे सर्वच बालशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या या गुणांना प्रेरीत करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा काहीही घडवू शकतो. त्याला अधिक दृढ करण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहीत करण्याचेही त्यांनी आवाहन केले. प्रा. जयदीप पाटील म्हणाले, की प्रत्येक शिक्षकाचे योगदान श्रेष्ठच असते. भारत कृषीप्रधान देश असला तरी तो जेव्हा विज्ञान तंत्रज्ञान म्हणून ओळखला जाईल तेव्हाच प्रदर्शनाचे यश असेल. विज्ञानाच्या माध्यमातून मूल्य जोपासना होणे गरजेचे आहे. जगासाठी जेव्हा काही तरी करायचे आहे असे वाटत असेल तर ते विज्ञानाच्या माध्यमातून साध्य करा.

परीक्षक म्हणून रवींद्र चौधरी (पाचोरा), नवनीत राजपूत (चोपडा), नवनीत सपकाळे (धरणगाव), शैलेंद्र चव्हाण (चहार्डी) यांनी काम पाहिले. निकाल असा.. प्राथमिक विद्यार्थी गट : प्रथम- अक्षर अग्रवाल, यज्ञेश बडगुजर (स्वामी विवेकानंद स्कूल), द्वितीय- भुश्रा पिंजारी (बालाजी विद्यालय, गांधली- पिळोदे), तृतीय- चंद्रकांत निकुंभ (शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे), उत्तेजनार्थ- नलिनी पाटील (साने गुरुजी कन्या विद्यालय), मसिरा नाझ (अलफैज उर्दू शाळा), माध्यमिक विद्यार्थी गट : प्रथम- वेदांत पाटील (सेंट मेरी स्कूल), द्वितीय- हर्शल पाटील, भावेश पवार (विजयनाना पाटील आर्मी स्कूल), तृतीय- किरण लोहार (पीबीए इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ- यश चौधरी (आदर्श विद्यालय, अमळगाव), संघमेध ब्रह्मे (सार्वजनिक विद्यालय, सारबेटे), प्राथमिक शिक्षक गट : प्रथम- तुषार देवरे (जि. प. शाळा, मारवड), द्वितीय- तसनीम बानो शफीक अहंमद (जि. प. उर्दू शाळा), तृतीय- कविता पाटील (जि. प. शाळा, जैतपीर), माध्यमिक शिक्षक गट : प्रथम- उमेश काटे (विजयनाना पाटील आर्मी स्कूल), द्वितीय- रशिदा जावेद (स्वामी विवेकानंद स्कूल), प्रयोगशाळा सहायक : प्रथम- प्रेरणा अमृतकर (स्वामी विवेकानंद स्कूल). कार्यक्रमात रवींद्र पाटील, रोहांशू पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. नीरज अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. उमेश काटे, दत्तात्रय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे व शरद पाटील यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!