अमळनेर येथे तालुकास्‍तरीय विज्ञान प्रदर्शनाचे दिमाखात उद्‌घाटन

अमळनेर : ‘ क्षेत्र कोणतेही असो त्‍यात आपण वेगवेगळे प्रयोग केले तर त्‍याचा सकारात्‍मक परिणाम दिसून येतो ‘ असे मत आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले. येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व स्‍वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्‍कुल यांच्‍यातर्फे आयोजित तालुकास्‍तरीय विज्ञान प्रदर्शनाच्‍या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्‍थानी आमदार चंदुलाल पटेल होते. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, पुणे विद्यापीठाचे कौन्‍सील सदस्‍य राजेश पांडे, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, बांधकाम सभापती मनोज पाटील, जिल्हा परिषद सदस्‍या मिनाताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती किशोर अहिरे, पालिकेचे शिक्षण सभापती नितीन निळे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, शिक्षणविस्‍तार अधिकारी पी. डी. धनगर, शापोआ अधीक्षक बी. पी. चौधरी, प्रतापशेठ चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, स्‍वामी विवेकानंद स्‍कुलचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, नीरज अग्रवाल, प्राचार्य गणेश मितपल्लीवाल, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एम. ए. पाटील, मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, नाशिक बोर्ड सदस्‍य प्रकाश पाटील, उपाध्यक्ष पी. एस. विंचुरकर, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, टीडीएफचे अध्यक्ष सुशील भदाणे, संघटनेचे समन्‍वयक मधुकर चौधरी, नवनीत सपकाळे, रवींद्र चौधरी, नवनीत राजपूत, शैलेंद्र चव्‍हाण आदी उपस्‍थित होते.

आमदार पाटील म्‍हणाले की, बालपणी अनेक विद्यार्थी वैज्ञानिकांचा अभ्यास करतात व त्‍याप्रमाणे वागण्याचा प्रयत्‍न करतात. तालुकास्‍तरीय विज्ञान प्रदर्शनातील बाल वैज्ञानिकांच्‍या संशोधनाला बळकटी देण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. साहेबराव पाटील म्‍हणाले की, पर्यावरणाचा ऱ्हास होताना विज्ञानाची कास धरली तर चांगली फळे मिळतात. कोणत्‍याही गोष्टीत विज्ञान लपलेले असते. विद्यार्थ्यांनी विज्ञान अंगीकारुन पर्यावरण संतुलन साधण्याचा प्रयत्‍न करावा. चंदूलाल पटेल म्‍हणाले की, विज्ञान हे प्रयत्‍नप्रमाद पध्दतीने विकसीत होत जाते. विज्ञान म्‍हणजे ज्ञानाची सुव्‍यवस्‍थित मांडणी आहे. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे त्‍यातूनच घडले अन्‌ विश्‍वविख्यात बनले. राजेश पांडे म्‍हणाले की, अशा विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होते. पर्यायाने हे भविष्यात वैज्ञानिकांच्‍या रांगेत बसतात, याचे सर्व श्रेय शिक्षकांचे असते.

विज्ञान प्रदर्शनाला डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान नगरी असे नाव देण्यात आले होते यावेळी नाशिकचे शिक्षण उपसंचालक नितीन बच्‍छाव, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, पाचोऱ्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी प्रदर्शनस्‍थळी भेट दिली. या प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटातून ६८, माध्यमिक विद्यार्थी गटातून ४८, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक गटातून ४८ तर प्रयोगशाळा परिचर गटातून १ असे एकुण १६५ उपकरणे मांडण्यात आली होती. यावेळी विज्ञान शिक्षक दिनेश साबळे (पिंपळी), साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थिनी अपूर्वा पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, दीपक महाजन यांच्‍यासह स्‍वामी विवेकानंद स्‍कुलचे विद्यार्थी अक्षर अग्रवाल, यज्ञेश बडगुजर, नमीत जैन यांचा यावेळी विशेष सत्‍कार करण्यात आला. यावेळी विना आगपेटीने विज्ञान मंत्र म्‍हणत विज्ञान कुंडाचे हवन करण्यात आले. विज्ञानावर आधारित रोबोटीक डान्‍स, डॉ. कलाम यांच्‍या जीवनावर आधारित नाट्य नृत्‍य आदी सादर करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी प्रास्‍ताविक केले. उमेश काटे, दत्तात्रय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!