खवशी येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्राचा उपक्रम

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्रात परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व प. पू. गुरुमाऊलीं च्या कृपा-आशिर्वादाने श्री दत्तजयंती निमित्त सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
खवशी ता.अमळनेर येथील गुरुदत्त मंदिराचे प्रांगणात ता.५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ या काळात कार्यक्रम पार पडणार आहे. सप्ताहभर सकाळी ४ ते ६ सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन (पारायण), सकाळी ६.१५ ते ६.३० औदुंबर प्रदक्षिणा, सकाळी १०.३० आणि सायंकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती होईल. समस्त नागरिक, भाविक, सेवेकरी यांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्रातर्फे करण्यात आले आहे.