राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील चिलाणेकर तर उपाध्यक्षपदी ईश्वर महाजन

जळगाव : राष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक व न्याय संगठन संस्थेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील चिलाणेकर (एरंडोल) यांची तर उपाध्यक्षपदी ईश्वर महाजन (अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संघटक पदी भिकन पाटील (पाचोरा) यांची नियुक्ती झाली आहे. उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुभाष भोई व राज्याचे उपाध्यक्ष गोपालजी मारवाडी यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले.

अन्याय- अत्याचार विरोधात लढा, सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जनहित आंदोलन, गरीब जनतेवरचा अन्याय दुर करुन न्यायाची बाजू मांडणे अशाप्रकारे जनतेच्या विविध न्याय हक्कांसाठी संस्थेचे कार्य चालते. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर उपाध्यक्ष ईश्वर महाजन संघटक भिकन पाटील यांचेसह नवनियुक्त पदाधिकारी जनतेच्या सेवेसाठी कार्य करतील. नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवाकरजी श्रीवास्तव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णाजी पांडे, प्रदेश सचिव प्रविण जुमळे, सहसचिव विनोद राठोड, यशवंत निकवाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!