बालरोगतज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन; प्रेक्षकांसह विद्यार्थ्यांचा प्रतिसाद


अमळनेर : येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांच्या रेखाटलेल्या चित्रांचे ‘प्रतिबिंब’ या २ दिवसीय भव्य चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.कस्तूरबा बाविस्कर व शंकरराव बाविस्कर यांच्या हस्ते काल संपन्न झाले. यावेळी रोटरी क्लबचेे अध्यक्ष पूनम कोचर, डॉ.सौ.हिरा बाविस्कर आदी मंचावर उपस्थित होते. प्रदर्शनाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

कलेचा उपासक म्हणून मी जोपासलेल्या छंदातून विविध छटांचे चित्र साकारले आहेत असे उद्घाटनावेेेळी डॉ.शरद बाविस्कर यांनी सांगितले. तर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित प्रा.प्रविण भावसार यांनी ‘डॉ बाविस्कर यांनी जोपासलेल्या कलेतून साकारलेले चित्र लक्षवेधी असल्याचे सांगितले. तर धुळे येथील निवृत्त प्राचार्य एस.एन.माळी यांनी सांगितले की, ‘विद्यार्थी दशेपासून शरद बाविस्कर यांनी आपल्या सृजनशील व्यक्तिमत्वानुरूप साजेसा जोपासलेल्या चित्रकलेचा छंद इतरांसाठी प्रेरणादायी आहे’. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी, डॉ.शरद बाविस्कर यांची चित्रशैली मुक्त असून ती अश्वयुगीन मानवाच्या मुक्त रेखाटन कलेच्या परंपरेतील आधुनिक व सृजनशील कलात्मक आविष्कार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक व सुत्रसंचालन अजय रोडगे यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे सेक्रेटरी वृषभ पारेख, रोहित संघवी, देवांग शहा, डॉ. राहुल मुठे, डॉ. किरण बडगुजर, डॉ.गोविंदराव पाटील, प्रा.लिलाधर पाटील, प्रतिक जैन, श्यामदास लुल्ला, चेलाराम सैनानी, नितीन कोल्हे, सतिष खंडेरिया, विनायक पिंपळीकर, सुबोध पाटील, महेश पाटील, संदेश पाटील आदींसह व रोटरी क्लब सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ.निखील बहुगुणे, जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील, सुनिल भामरे, गं.का.सोनवणे, जयवंत शिसोदे आदींनी प्रदर्शनाला भेट दिली. अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन यांनी या दोन दिवस चालणाऱ्या प्रतिबिंब या प्रेरणादायी चित्रप्रदर्शनास उपस्थिती देण्याचे जाहीर आवाहन सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह कला शिक्षकांना केले आहे. अनेक शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनीनी शिस्तबद्धपणे चित्र प्रदर्शन पाहिले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनास भेेट दिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!