राष्ट्रवादी उमेदवारीसाठी रॅलीचे आयोजन

तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोशल मीडिया बैठकीत निर्णय

अमळनेर : येथील तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या वतीने नुकतीच बैठक आयोजीत करण्यात आली. या बैठकीत तारीख १ रोजी रॅलीचे आयोजन करुन राष्ट्रवादी  कॉंग्रेस व कॉंग्रेस मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरावयाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रॅली मंगळग्रह मंदिरापासुन शक्तीप्रदर्शन करुन काढण्यात येणार आहे. त्यासाठी अमळनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या वतीने विजय मारुती मंदिरापासुन अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अधिकाधिक उपस्थितीसाठी सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातून विद्यार्थी मित्र जमा करण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण भदाणे यांनी केले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील , शहराध्यक्ष सुनिल शिंपी, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष राहुल गोत्राळ, शहराध्यक्ष शुभम बोरसे, यतिन पवार, सनी गायकवाड, दिनेश कोठारी, उमेश सोनार, अभिषेक धुमाळ, शुभम देशमुख, अभिजित वाघ, जयेश सोनार, गणेश पाटील, निलेश माळी, चेतन पाटील, धीरज पाटील ,नरेंद्र परदेशी, भाग्येश पाटील, गौरव पाटील, ईशान्त पाटील, प्रथमेश सोनार, अनिरुध्द शिसोदे, अक्षय पाटील, भुषण पाटील, रविकिरण पाटील, मिलिंद वानखेडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!