खर्दे येथील तरूणाची आत्महत्या

अमळनेर : तालुक्यातील खर्दे येथील तरूणाने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खर्दे येथील संदीप भाऊसाहेब पाटील (वय-२०) या तरूणाने ता.२९ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास भाऊसाहेब लक्ष्मण पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. संदीपच्या वडिलांवर वि. का. सेवा सोसायटीचे ५० हजार व खाजगी मिळून सुमारे १.५ लाख रूपये कर्ज होते. संदीप जळगांव येथे आय.I.T.I करत होता. फी चे पैसे घेण्यासाठी तो घरी आला परंतु कर्जाअभावी तो पूर्ण फी भरू शकला नसल्याचे कळते.
खर्दे येथील राजेंद्र भिवसन पाटील यांच्या फिर्यादीवरून या घटनेची खबर मारवड पोलीसात दिली आहे. पो.स्टे ला आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास मारवड पो.स्टेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!