अमळनेर: तालुक्यातील आमोदे येथेे सालाबादाप्रमाणे नवरात्रोस्तव निमित्त तारीख २९ सप्टेबर ते ६ ऑक्टोबर या काळात अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे चोवीसावे वर्ष आहे. दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ किर्तन याप्रमाणे सप्ताहभर कार्यक्रम होणार आहेत. तारीख २९ रोजी ह.भ.प.नाना महाराज (दोंडाईचा), तारीख ३० रोजी प्रल्हाद महाराज (कळमसरे), तारीख १ रोजी सुनिल महाराज (विखरण), तारीख २ रोजी धनश्रीताई शिंदे (भडगांव), तारीख ३ रोजी अतुल महाराज (नारणे), तारीख ४ रोजी उल्केश महाराज(पातोंडा), तारीख ५ रोजी मंदार शास्त्री (भुसावळ) यांचे जागर किर्तन, संध्याकाळी ४ ते ५ पालखी मिरवणुक, तारीख ६ रोजी प्रकाश महाराज (शिंदखेडे) यांचे सकाळी ९ ते ११ वेळेत काल्याचे किर्तन तर दुपारी १२ वाजता स्वर्गीय ह.भ.प.नारायण नामदेव पाटील यांचे स्मरणार्थ ह.भ.प. नगराज नारायण पाटील यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परीसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे संयोजक, ग्रामस्थ मंडळ आमोदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.