सरस्वती विद्या मंदीरात पूज्य साने गुरुजी जयंती साजरी

अमळनेर : येथील सरस्वती विद्या मंदीर शाळेत स्वातंत्र्य सेनानी पूज्य साने गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘श्यामची आई’ या पुस्तकातील कथा विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली. सानेगुरुजी यांचे स्मरण करीत विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना म्हटली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रणजित शिंदे होतेु. प्रमुख पाहुणे विद्याधन अकॅडमी चे संचालक प्रा.संजय न्हायदे होते. मान्यवरांनी पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी मार्गदर्शन करतांना ‘साने गुरुजींनी सांगितलेल्या ‘जगाला प्रेम अर्पावे’ या मूल्याधिष्ठित मानवतेच्या खऱ्या धर्माचे पालन करणे ही काळाची गरज आहे’ असे प्रतिपादन रणजित शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ पुुस्तकातील वाचक भैय्यासाहेब मगर यांच्या आवाजातील श्राव्यकथा विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली. श्यामची आई कथा एकविण्याच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.संगीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ऋषिकेश महाळपुरकर यांनी तर आभार धर्मा धनगर यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक आनंदा पाटील, सौ.गीतांजली पाटील, सौ.संध्या ढबू आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!