साई इंग्लिश अकॅडमी तर्फे ‘श्यामची आई’ पुस्तकावर आधारीत स्टोरी टेलिंग स्पर्धेचे आयोजन

अमळनेर : साई इंग्लिश अकॅडमी तर्फेे मंगळवार, ता.२४ डिसेंबर रोजी साने गुरुजी जयंतीचे औचित्य साधून ‘श्यामची आई’ पुस्तकावर आधारीत स्टोरी टेलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सोनाली विलास पवार, निर्भय धनंजय सोनार, भावेश राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले.
लहान गट व मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल लागला असून यात लहान गटात प्रथम : मौर्विका मिलिंद वैद्य (इ.७वी), द्वितीय : समृद्धी विजय पाटील (इ.७वी), तृतीय : ओमकुमार नरेंद्र सोनार (इ.७वी), उत्तेजनार्थ दोन : श्लोक संदीप सूर्यवंशी (इ.७वी), पुनम शितल भारोटे (इ.५वी) मोठ्या गटात प्रथम : अपूर्वा ईश्वर पाटील(इ.१०वी), द्वितीय : चेतना जितेंद्र पाटील (इ.९वी), तृतीय : हर्षदा गुलाब वारुळे (इ.९वी), उत्तेजनार्थ तीन : रुचा सुरेंद्र पाटील (इ.९वी), मेघना प्रकाश पाटील (इ.९वी), रोहन संदिप पाटील (इ.९वी) यांनी यश मिळविले.


Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!