श्रीरामपूर येथे विशेष कार्यक्रमात ईश्वर महाजन व आश्विन पाटील ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड’ ने सन्मानित

अमळनेर : येथील पत्रकार ईश्वर रामदास महाजन व पक्षीमित्र आश्विन लिलाचंद पाटील यांना नुकतेच ता. २३ रोजी श्रीरामपूर येथे आयोजित कार्यक्रमात ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड २०१९’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ‘डब्ल्यू.सी.पी.ए.’ या संस्थेचे अमेरिकेचे अध्यक्ष डॉ.ग्लेन मार्टिन व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे, तहसीलदार प्रशांत पाटील, जेष्ठ गांधीवादी समाजसेवक प्रा.ई.पी.मेनन, बंगोलरचे अर्थतज्ज्ञ प्रा.नरसिंहा मूर्ती, अध्यक्ष दत्ता विघावे यांच्या हस्ते त्यांना सन्मान पत्र, स्मृतीचिन्ह, डब्लू.सी.पी.ए.चे सभासदत्व देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री महाजन यांची ‘दैनिक साईमत’ मधील त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विषयावर उत्कृष्ट लेखनाची तर आश्विन पाटील यांची पर्यावरणवादी व पक्षीमित्र म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कार्याची संस्थेने दखल घेऊन जळगाव जिल्ह्यातून निवड केली आहे. दोनही शिक्षक पेशातील असून महाजन हे महात्मा फुले विद्यालय, देवळी येथे तर पाटील हे माध्यमिक विद्यालय, शिंदी येथे कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!