माळी समाज संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी यांची बैठकीत चर्चा

अमळनेर : येथील क्षत्रिय माळी समाज संस्थेच्या इमारतीत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती महोत्सव निमित्त नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत तीन दिवस कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून जयंती मिरवणुकीने साजरी करण्याचे माळी समाज संस्थेच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
महिलांना सक्षम करून शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवणाऱ्या थोर समाज सेविका सावित्रीमाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी आहे. या पार्श्वभूमीवर नियोजन संदर्भात अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी माळी समाज संस्थेचे अध्यक्ष दिलीप माळी, दिनेश माळी, सचिव डॉ.उदय खैरनार, गोकुळ बागुल, आर.एस.माळी, माजी नगरसेवक अँड.सुरेश सोनवणे, महेश माळी, अँड.नगराज माळी, खेमराज बोरसे, विजय माळी, क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच चे संस्थापक अध्यक्ष व माळी समाज संस्थेचे विश्वस्त प्रविण बी.महाजन व समाज बांधव उपस्थित होते. जयंती महोत्सवात शहर व तालुक्यातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था, महिला मंडळे, विद्यार्थी, समाज बांधव यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे करण्यात आले आहे.