
अमळनेर : महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज ता.२४ रोजी ३३ वा राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न झाला. येथील गंगाराम सखाराम हायस्कूल मधील आय.एम.ए हॉलमध्ये कार्यक्रम झाला. राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा जिल्हाध्यक्ष विकास महाजन कार्यक्रमाचे उद्घाटक होते. अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश गुलाबराव बापू पाटील, जी.एस.हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडा, पुरवठा अधिकारी संतोष बावणे, वजनमाप अधिकारी कुवरसिंग राजपूत, दिशा गॅस एजन्सीचे दिनेश रेजा व पारख एजन्सीचे रितेश पारख, अशासकीय सदस्य सतीश देशमुख, अंमळनेर ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.मनोहर शेठ भांडारकर, ऊर्जा मित्र सुनील वाघ आणि मान्यवर उपस्थित होते. तालुकाध्यक्ष मकसूद भाई बोहरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी चोपडा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष केदार पाटील यांनी सायबर क्राईम बाबत प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. दिशा गॅस एजन्सीचे दिनेश रेजा यांनी गॅस सिलेंडर विषयक प्रात्यक्षिक करून मनातील भीती घालवली. ग्राहक सप्ताहानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेचे विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विकास महाजन व तालुका अध्यक्ष मकसूदभाई बोहरी यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली अमळनेरातील ग्राहक चळवळ यशस्वी झाली आहे. पेट्रोलियम पदार्थ नियंत्रणाखाली का नको ? अशी खंत व्यक्त करीत पेट्रोलियम पदार्थ जीएसटी च्या नियंत्रणाखाली येणे अत्यावश्यक आहे असे मत राजेंद्र सुतार यांनी व्यक्त केेेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून तालुकाध्यक्ष मकसूद भाई बोहरी यांच्या नागरिक सनद या मागणीस त्वरित मान्यता देऊन येत्या दोन दिवसात अमळनेर तहसील कार्यालयात नागरिक सनद लावण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी पुरवठा अधिकारी संतोष बावणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकसूद भाई बोहरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विजय शुक्ल यांनी तर आभार प्रदर्शन महिला आघाडी प्रमुख ॲड.भारती अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक आर.पी.साळुंखे, अशोक ठाकरे गंगाधर सोनवणे, सौ.विनिता शुक्ल, सौ.रत्ना वानखेडे, ना.गो. पाटील तसेच ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक राजेंद्र सुतार, सदस्य ऊर्जा मित्र सुनील वाघ, सहसचिव योगेश पाने, ताहा बुकवाला, खदीर सादिक, हेमंत भांडारकर, ॲड. कुंदन साळुंखे, मधुकर सोनार, करुणा सोनार, अंजू ढवळे, वनश्री अमृतकार, ॲड.उर्मिला अग्रवाल, मेहराज बोहरी, खा.शि.मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरी पाटील, अलका गोसावी, जी.एस हायस्कूलचे मुख्याध्यापक मोराणकर, पर्यवेक्षक पाटकरी, शिक्षक बंधू व विद्यार्थी उपस्थित होते.