महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे राज्यभर पत्रकारांना हेल्मेट वाटपाचा अभिनव उपक्रम

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना पत्रकारदिनी हेल्मेट वाटपाचे आयोजन; नाव नोंदणीचे आवाहन

जळगाव : येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जिल्हा शाखेच्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश अध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने पत्रकारांना राज्यभर हेल्मेट वाटप करण्याचा अभिनव उपक्रम पत्रकार संघ राबवित आहे. त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना पत्रकार दिना निमित्त हेल्मेट वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी हेल्मेट मिळविण्याकरिता नाव नोंदणी करणे आवश्यक असून लवकरात लवकर आपली नाव नोंदणी मराठी पत्रकार संघाकडे करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे मो. ९०२१९६९१००, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा मो. ८९७५८१४५५५, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे मो. ८६००६६४९७७, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी मो. ९५२७१०८६७८ यांचेकडे दिलेल्या नंबर वर आपले नाव नोंदणी करता येईल.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!