
अमळनेर : कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील रहिवासी तथा ग.स.सोसायटीचे कर्मचारी अभिमन्यू मधुकर काटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा ता.२७ रोजी दुपारी एक वाजता कोळपिंप्री येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. पाचगणी येथील स्विट मेमरीज् स्कूलचे माध्यमिक शिक्षक किरण काटे यांचे ते मोठे बंधू तर अंकित काटे व मनीष काटे यांचे वडील होत.