अमळनेर : महात्मा फुले स्मृति दिनानिमित्त ता.२८ नोव्हेंबर रोजी ओबीसी विद्यार्थी- शिक्षक- पालक विकास असोसिएशन, धुळे यांच्यावतीने नाशिक विभागात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६० शिक्षक बांधव व भगिनींना पुरस्कार जाहीर झाले होते. यात, अमळनेर महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका जयश्री साळुंके यांना गुरुगौरव पुरस्काराने स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.एस.टी.पाटील, नगरसेवक वासुदेव देवरे, प्रवीण महाजन नगरसेवक, शिंदखेडा उपनगराध्यक्ष भिलाजी पाटील, उद्यान पंडित विलासराव माळी, जितेंद्र खैरनार, प्रा.आर.ओ.मगरे, नितीन टोलाट, अतुल सूर्यवंशी, अण्णा गजमल माळी, मिलिंद सोनवणे, प्रल्हाद सोनार या मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक बांधव भगिनींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी असोसिएशनच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी तर प्रास्ताविक सचिव ईश्वर महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन विश्वस्त काशिनाथ माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय खलाणे, रूपेश कुलकर्णी, व्ही.आर.महाजन, अनिल महाजन, ईश्वर महाजन, काशिनाथ माळी, सुरेश महाजन, हरी माळी ,निंबा देशमुख, दशरथ लांडगे, मनवंतराव साळुंखे, उदय पाटील यांनी प्रयत्न केले.