‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून फोटोग्राफर बांधवांच्या भावना दुखावल्याबद्दल फोटोग्राफर असोशिएशनतर्फे निवेदनाद्वारे निषेध

अमळनेर : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून फोटोग्राफर बांधवांच्या भावना दुखावल्याबद्दल अमळनेर तालुका फोटोग्राफर असोशिएशनतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात २३ डिसेंबर रोजी झालेल्या एपिसोड मध्ये कलाकार अभिजा भावे, राहुल मदगुल व राज हंचनाळे या कलाकरांनी प्री-वेडिंग संदर्भात कला सादर केली. त्यात आमच्या सारख्या असंख्य फोटोग्राफर लोकांची मने दुखावली आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. त्यातील कॉमेडी ही कुटुंबाने एकत्र बसून बघावी इतकी सुंदर असते. आपल्या कार्यक्रमात आपण सर्वच क्षेत्रातील व्यवसाय, नोकरी, राजकारण, समाजकार्य यावर अफलातून टायमिंगने कॉमेडी करत असतात. आम्ही सर्व ती दिलखुलास पाहत आनंद घेत असतो. परंतु ता.२३ रोजीच्या आपल्या कार्यक्रमात प्री वेडिंग शूट दाखवतांना फोटोग्राफरची इमेज ही एकदम चुकीची दाखवली. आपल्या कलाकार लोकांना प्री-वेडिंग फक्त करमणूक वाटत असेल. विनोदाचा भाग असेल. परंतु आम्हा फोटोग्राफर बांधवांना ते आमचे घर चालवण्यासाठी चे खूप मोठे उत्पानाचे साधन आहे. आधीच मोबाईल मूळे फोटोग्राफी व्यवसाय धोक्यात आला आहे. आपण तरी हे आमचे उत्पन्न चे साधन चुकीचे असे दर्शवून चुकीचा मेसेज समाजात देऊ नका व फोटोग्राफर बांधवांची प्रतिमा मलिन करु नका. कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पाठीवर असणारे सर्वच मंडळी, फॅमिली बघत असते, त्यांच्यात ९९% चांगले असणाऱ्या फोटोग्राफर यांची इमेज ही खराब होऊ नये अशी फोटोग्राफर म्हणून आपणास विनंती करतो. कृपया, आपण आपल्या पुढील कार्यक्रमात या गोष्टींचा उल्लेख करून, सर्वच फोटोग्राफर असे नसतात हा फक्त विनोदाचा भाग होता असे नमूद करावे.
सदर निवेदन नायब तहसीलदार श्री. बी.डी.धिवरे, अमळनेर यांना देण्यात आले. याप्रसंगी महेंद्र पाटील, मनोज चित्ते, दीपक बारी, युवराज पाटील, सचिन बडगुजर, शरद पाटील, प्रवीण पाटील, संतोष पाटील, किशोर पाटील, समाधान अहिरे, सोनू पाटील, आप्पा पाटील, शशिकांत पाटील, फारूक शेख, इक्बाल शेख, पप्पू पाटोल यासह असंख्य फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!