नगरपालिकेच्या प्रभाग क्र.१७ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप

अमळनेर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रभाग क्रमांक १७ चे नगसेवक विनोद लांबोळे व रत्नाबाई महाजन यांच्या तर्फे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा ‘स्वच्छ भारत अभियान’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे स्वच्छता राखण्याकामी नेहमी मोलाचे योगदान असतेच. शिवाय, अमळनेर नगरपालिकेला हागणदारीमुक्ती चा पुरस्कार मिळण्यात देखील सफाई कामगारांचा खारीचा वाटा आहे असे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.

कार्यक्रमात मुकादम बलराम हटवाल, समाधान थोरात, भगवान मैराळे, सचिन ढिवरे, रविंद्र बिऱ्हाडे, दिलीप बिऱ्हाडे, संतोष बैसाणे, योगेश संदानशिव, रविंद्र सोनवणे, रमाबाई सपकाळे, मिनाबाई सरदार, गोविंदा लोहरे, दिपक कलोसे, करण कलोसे, सरिताबाई भुरट, सविता कल्याणे यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य निरिक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, प्रकाश महाजन, नरेंद्र चौधरी, पप्पु महाजन, भरत महाजन, सागर महाजन, दादू महाजन, निलेश भोई, देविदास भोई, नितीन भदाणे, मंगेश महाजन आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!