आनंद मेळाव्याने आर.के.नगर येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत

अमळनेर : येथील आर.के.नगर येथे सरत्या वर्षाला निरोप देतांना महिलांनी भव्य आनंद मेळाव्याने जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि खाद्यपदार्थ स्टॉल लावण्यात आले होते. आंनद मेळाव्याचे आयोजन स्थानिक महिला कार्यकर्त्या निताताई प्रजापती, सौ.हेमलता पाटील, सौ.सुहासिनी राणे, सौ.रत्ना पाटील आदींनी केले होते.

आनंद मेळाव्यात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले होते. खवैय्यांसाठी खास खापरावरची पुरणपोळी, भिजवलेल्या मूग डाळीची भजी, विविध चटपटीत चाट पदार्थांचे स्टॉल लज्जत वाढविणारे ठरले. तर बाल गोपालांसाठी विविध खेळ व मनोरंजन कार्यक्रम मेेेेळाव्याचे आकर्षण ठरले. याप्रसंगी आयोजित नृत्यस्पर्धेत मुलामुलींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. आनंद मेळाव्यात लहान मोठ्यांसह महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने यात्रेचे स्वरूप आले होते. मेळाव्यात लावलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलचालक महिला युवतींना शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित शिंदे यांचे मार्फत उत्कृष्ट स्टॉल धारक व सहभागी स्टॉल धारकांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तर नशीबवान प्रवेशिकेचा (लकी ड्रॉ) भाग्यवान विजेता हर्ष लिलाधर प्रजापती ठरला. याप्रसंगी आ.सौ.स्मिताताई वाघ, नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई पाटील यांनी आंनद मेळाव्यास उपस्थिती देत संयोजकांचा व सहभागी स्टॉलधारकांचा उत्साह वाढविला. नृत्यस्पर्धेत प्रथम तीन विजेते निवडण्यात आले. यात, प्रथम कु.शैलजित रणजित शिंदे, द्वितीय कु.श्रद्धा गणेश परदेशी, तृतीय भुवनेश्वरी जगदीश भदाणे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अपेक्षा पवार, सौ.शितल सावंत, यांनी केले. आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सौ.योगिता पांडे, सौ.निलिमा सोनकुसरे, अँड. मिनाक्षी राठोड, सौ.उषा कासार, करुणा सोनार आदींनी परिश्रम घेतले. सुभाष सूर्यवंशी, नगरसेवक राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रविण सातपुते यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!