जळगाव जिल्ह्यातील दहा जि.प.शाळांतील ९० विद्यार्थ्यांचा व १० शिक्षकांचा सहभाग
अमळनेर : समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान २०१९-२० उपक्रमांतर्गत जि.प.जळगाव द्वारा आयोजित Exposure visit outside state या कार्यक्रमात आंतरराज्य सहल / अभ्यास भेटीसाठी ता.२ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत मध्यप्रदेश राज्यातील ओंकारेश्वर, माहेश्वर, इंदौर, उज्जैन व मांडवगड येथे जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दहा तालुक्यातून प्रत्येकी एका शाळेची निवड करण्यात आली होती. तसेच प्रत्येक शाळेतील ५-५ मुले/मुली याप्रमाणे अमळनेर तालुक्यातून निवड झालेल्या जि.प.उच्च प्राथ.शाळा,पिंगळवाडे येथील उपक्रमशिल मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय सोनवणे तसेच त्यांच्या सोबत शाळेतील ९ विद्यार्थी आंतरराज्य सहलीसाठी रवाना झाले. यात, प्रणाली अशोक पाटील (इ.७ वी), निता रामचंद्र पारधी (इ.७ वी), मोहिनी छगनलाल दाभाडे (इ.७ वी), कविता विजय पारधी (इ.७ वी), कल्पेश कैलास पारधी (इ.७ वी), पियुष कविकांत पाटील (इ.६ वी), हितेश विनोद पाटील (इ.६ वी), हर्षल किरण पाटील (इ.६ वी), कुंदन किरण सपकाळे (इ.६ वी) या बालचमूचा समावेश आहे.
या बालचमूला चंद्रकांत पाटील, सुभाष पाटील, अशोक पाटील, नाना सपकाळे, किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विक्रम शेलार, कविकांत पाटील, प्रविण पाटील, रविंद्र पाटील, ललिता पारधी, संगिता पारधी, उषा दाभाडे, आशा पारधी, सुशिला मिस्तरी, पिंगळवाडे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व शिक्षकवृंद यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच अमळनेर बसस्थानकावर शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख गोकूळ पाटील, रविंद्र पाटील व उपशिक्षिका वंदना सोनवणे उपस्थित होते.