
अमळनेर : येथील श्री संत सखाराम महाराजांच्या पावन नगरीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कवी, लेखक व कलाकार कर्मचारी वर्गाचा एसटीच्या इतिहासातील पहिलाच साहित्य मेळा ‘एस.टी. ची काव्य लहर’ रविवार, ता.५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता अमळनेर बस स्थानक शेजारील टाऊन हाॕल येथे आयोजिलेला आहे.
या कवि संमेलनात रा.प.म.चे महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, कलाकार वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात, धुळे आगारातील वाहक रविंद्र चौधरी, राजेश सोनार, सुनिल गवळी ह्या कवी मित्रांसह गायक कलाकार रूपेशजी तावडे हे कर्मचारी सहभागी होणार आहेत. याशिवाय बाहेरील अन्य आगारातील साहित्यिक, कलाकार सहभागी होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमळनेर आगारातील मनोहर पाटील, प्रविणभाऊ मिस्ञी व समस्त रा.प.म. कर्मचारी सहकार्य करीत आहेेेत. संमेलनात साहित्य रसिक एसटी कर्मचारी बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.