कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी

अमळनेर : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील कुलगुरू व राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेतर्फे नुकतीच ता.७ रोजी अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांचेकडे समक्ष निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांना रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आली आहे.
निवेेदनात नमूद केले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ABVP व RSS ची हिटलर शाही चालते. त्यांच्या आदेशाने कुलगुरू तसेच विद्यापीठाच्या सर्व कमिटींवर ABVP कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे.
विद्यापीठात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील (ABVP प्रमुख) हे रोज कुलगुरूंच्या कॅबिन मध्ये बसून हिटलर शाही करतात. विद्यापीठात कोणताही निर्णय त्यांच्याशिवाय घेतला जात नाही. प्राध्यापक भटकर सर यांचे प्रेम प्रकरण दाबले जाते. विद्यापीठात छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणार होते ती फाईल देखील कुलगुरूंनी गुंडाळून लावली. माजी खासदार विजय नवल पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने फेलोशिप चालू करावी यासाठी निधी दिला होता. ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. तसेच विद्यापीठाच्या ठेवी राष्ट्रीय बँकेत ठेवल्या होत्या परंतु त्या जळगाव जनता बँकेत ठेवल्या गेल्या याचे कारण असे की व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील व त्यांचे बंधू हे त्या बँकेशी सलग्न आहेत म्हणून त्या ठेवी जनता बँकेत ठेवल्या. विद्यापीठात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून शिक्षणतज्ञ यांची निवड करतात. परंतु कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ABVP प्रमुख दिलीप रामू पाटील यांची नियुक्ती झाली. ते कुठलेही शिक्षणतज्ञ नाही, कोणत्याही विषयात विशेष प्राविण्य नाही तरीही त्यांची व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
या सर्व प्रकरणांची दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, फार्मसी स्टुडेंट कौन्सिल चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भूषण संजय भदाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांनी केली आहे. सदर पत्रकावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, अमळनेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी शहराध्यक्ष उमेश सोनार, पारोळा तालुकाध्यक्ष अभिषेक पाटील, अमळनेर राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी, चाळीसगाव तालुकाध्यक्ष याग्नेश बाविस्कर, धरणगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, अभिषेक धमाल, अनिरुध्द शिसोदे, शुभम पाटील, गौरव पाटील आदींच्या सह्या आहेत. सदर प्रकरण लवकरात लवकर मा.मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्याकडे निकाली काढले जाईल असे अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.