
अमळनेर : महाराष्ट्र राज्यातील सन २००५ नंतर नियुक्त झालेले सर्व सरकारी कर्मचारी व शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी तसेच केंद्र व राज्य स्तरावरील अन्य मागण्या व सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशातील कामगार व कर्मचारी ता. ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपावर होते. या संपामध्ये जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने देखील सहभाग घेतला. अमळनेर उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील पदोन्नत नायब तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.
या संपात आर.एस.चौधरी, के.एम.जोशी, ए.जे.वळवी, ए.एम.बागुल, पी.एस.धमके, श्रीमती पी.एच.अहिरराव, श्रीमती बी.के.शेवाळे, बी.डी.पाटील, आर.पी.साळुखे, श्रीमती व्ही.एच.पाटील, आर.जे.शिरसाठ, ए.एल.ठाकरे, एन.जी.पाटील, श्रीमती. एस.पी.धोंगडे, श्रीमती कल्याणी पाटील, दिनेेश सोनवणे, श्रीमती प्रियंका सूर्यवंशी, एस.व्ही.पाटील, के.बी.चौधरी, डी.एस.सोनवणे, श्रीमती एस.एल.पाटील, श्रीमती. पी.बी.पाटील, के.एस.पाटील, किरण मोरे, एस.के.ब्राम्हणे, जी.जी.सोनावणे, एन.आर.ढोकणे, ए.आर.पाटील, एस.आर.गरुडकर, एम.जे.काटे, आर.एन.पाटील, श्रीमती एच.आर.राणे, श्रीमती एम.जे.मराठे, ए.पी.संदानशिव, एस.एम.सोनवणे, ई.यु मैराळे, एस.जी.कोळी आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.