श्री मंगळग्रह व ममलेश्वर मंदीरात पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांनी घेतले दर्शन

अमळनेर : तालुक्यातील झाडी येथील रहिवासी व गुजराथ पोलीस दलात नावलौकीक असलेले प्रकाश पाटील यांनी नुकतीच ता.८ रोजी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदीर व झाडी येथील ममलेश्वर मंदीरात जावून सपत्निक दर्शन घेतले. झाडी येथील ममलेश्वर मंदीराचे विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने आज तेथे भव्य असे मंदीर उभारले आहे. साहजिकच यातून त्यांचे आपल्या गावाविषयी असलेले प्रेम व सामाजिक बांधिलकी लक्षात येते. या भेटी दरम्यान श्री पाटील यांनी कलागुरु मंगल कार्यालयात तालुक्यातील पत्रकारांची सदिच्छा भेट घेतली. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांशी हितगुज करुन भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरजूशेठ गोकलाणी, पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!