अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने ३० सप्टेबर रोजी प्रताप तत्वज्ञान केंद्रात ‘मानव्यविद्या शाखेतील संशोधन पध्दती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘अर्थिक मंदी’ या विषयावर डॉ चंद्रकांत कोकाटे यांचे व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ एल. एल. मोमाया (विभाग प्रमुख) तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या डॉ ज्योती राणे होत्या. विचार मंचावर डॉ जयेश गुजराती (समन्वयक,आय क्यु एस सी), डॉ डी एन वाघ (संचालक,हुम्यानीटीस), डॉ हर्षवर्धन जाधव (अर्थशास्त्र विभाग प्रमुख ),डॉ सुनिल संदानशिव उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य डॉ. राणे यांनी उत्तम संशोधक कसे व्हावे, संशोधन पद्धती काय असते ? यावर मार्गदर्शन केले. डॉ शाकिर यांनी संशोधन पद्धती संबंधी सोप्या भाषेत मांडणी केली. संशोधन काय आहे व काय नाही ? दर्जेदार संशोधन काय असते ? समस्या सूत्रण काय आहे ? साहित्याचा आढावा काय असते ? अहवाल लेखन म्हणजे काय ? या संबंधी मूलभूत मार्गदर्शन केले.
डॉ कोकाटे यांनी अर्थिक मंदी संबंधी माहिती देताना अर्थिक मंदीचा ईतिहास, अर्थिक व्यवस्थेतील अंतरंग, मंदीची कारणे, उपाय योजना, रचनात्मक दोष वा त्रुटी या संबंधी मार्गदर्शन केले. पायाभुत उद्योगाची गरज, दीर्घकालीन गुंतवणूक, रेपो दर यासंबंधी उपाय सांगितले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी, विजय तुन्टे, हर्षवर्धन जाधव, व्ही बी मांटे, डी आर चौधरी, रवी बालसकर, शिन्दे निकेतन, अविनाश पाटील, नाईक, नितिन पाटील, रामदास वसावे, छोटु मावची आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ विजय तुन्टे यांनी कार्यशाळे संबंधी प्रास्ताविक व डॉ शाकिर(औरंगाबाद) यांचा परिचय करुन दिला. डॉ व्ही बी मांटे यांनी डॉ कोकाटे(औरंगाबाद)यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन डॉ संदीप नेरकर यांनी तर आभार डॉ हर्षवर्धन जाधव यांनी मानले.