अमळनेरः येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक बिस्वनाथ दास यांनी नुकतीच अमळनेर निवडणूक कार्यालयास भेट घेऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला. भेटीत दास यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदा तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद वाघ, अमळनेर विभागाचे डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी भरत वारे यांचेसह सर्व सेक्टर अधिकारी उपस्थित होते.