
अमळनेर :- येथीलश्री नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक ,विद्यालय अंमळनेर येथे SWEEP कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम साठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
रांगोळी स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट रांगोळ्या काढल्या. तालुक्याचे तहसीलदार मिलिंद वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी आर.डी.महाजन यांनी स्पर्धास्थळी भेट देवून स्पर्धक विद्यार्थिनींचे कौतुक केले. यावेळी स्पर्धक विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील सर यांनी तहसीलदार साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.