कोंडाजी व्यायाम शाळेतर्फे बोरी नदी पात्रात कुस्त्यांची भव्य दंगल

आमदार अनिल पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या हस्ते मानाची कुस्ती

अमळनेर : येथील पैलाड भागातील कोंडाजी व्यायाम शाळेतर्फे सालाबादाप्रमाणे बोरी नदीच्या पात्रात चोख पोलीस बंदोबस्तात कुस्त्यांची भव्य दंगल झाली. यातील विजेत्यांसाठी अनेक बक्षिसांचे प्रायोजक मंगळग्रह सेवा संस्था होती. कुस्त्यांच्या दंगलीत कोळगाव येथील पप्पू पैलवान, चाळीसगाव येथील समाधान पैलवान, पैठण येथील सुरेश पैलवान, शिंदी कोळगाव येथील संदीप पैलवान, सांगवी येथील धनंजय पैलवान, एरंडोल येथील गुरुदास पैलवान, धुळे येथील धीरज राजपूत पैलवान, पारोळा येथील किशोर पैलवान, नंदुरबार येथील अलीम पैलवान, जळगाव येथील गोलू पैलवान, कोपरगाव येथील संदीप पैलवान, पेडगाव येथील अजय पैलवान यांनी मैदान गाजवले. यावेळी पंच म्हणून राजू पाटील पैलवान, संजय पाटील पैलवान, विठ्ठल पाटील पैलवान, रघुनाथ कंखरे पैलवान, गणेश पाटील पैलवान व डिगंबर पाटील पैलवान यांनी काम पाहिले. मानाची कुस्ती आमदार अनिल पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या हस्ते लावण्यात आली. नगरसेवक प्रताप शिंपी, स्कुल बोर्डाचे चेअरमन नितीन निळे, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, माजी नगरसेवक बाळा पवार, सुनील शिंपी, देविदास देसले, ज्ञानेश्वर पाटील, जीवन पवार आदी उपस्थित होते.
दंगलीच्या यशस्वितेसाठी माजी नगरसेवक संजय पाटील पैलवान, भोला टेलर, सुनील देवरे, विजय नवल पाटील, विश्वजीत पाटील, विकास महाराज ,पप्पू पाटील, विकास पाटील, समाधान पाटील, टीलू पाटील, बाबा पाटील, अमोल पाटील, मंगेश पाटील, गोलू पाटील, पप्पू पाटील, विकी कापुरे, राहुल पाटील, रवी पाटील आदींनी सहकार्य केले. दंगल पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी बोरी नदीच्या पात्रात मोठी गर्दी केली होती.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!