ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात सामाजिक संदेश देत कार्यक्रमांचे सादरीकरण

अमळनेर : येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने करण्यात आले. सोबत तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील, संचालक पराग पाटील, संचालक प्रा.देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी उपस्थित होते. आकर्षक रोषनाई, संगीत क्षेत्रातील कलाकारांची साकारलेली आरास, विविध पद्धतीने केलेली सजावट उपस्थितांचे आकर्षण ठरली. या प्रसंगी वर्षभरात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच सी.बी.एस.ई माध्यमाच्या शाळांसाठी ट्रेनर म्हणुन नियुक्ती बद्दल प्राचार्य विकास चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देत विविध गीतांवर नृत्य करत व विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीचा कानमंत्र दिला. संस्थेच्या कार्याविषयी व राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांनी संस्थेच्या कार्याबद्दल व भविष्यातील योजनांबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव कटीबद्ध असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला. सुत्रसंचालन शारदा महिंद, सानिका पवार, वैष्णवी पाटील, करीना पाटील, रोनीत पवार यांनी केले तर आभार प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!