पुरोगामी विचार मंच तर्फे शनिवारी (ता.२५) विवेक जागर व्याख्यान

सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांचे “भारतीय संविधान धोक्यात ?” या विषयावर व्याख्यान

अमळनेर : राज्यभर सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पुरोगामी विचार मंच तर्फे ता.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता विवेक जागर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख वक्त्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर उपस्थित राहणार असून त्या “भारतीय संविधान धोक्यात ?” या विषयावर व्याख्यान करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे असून अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रा.अशोक पवार असतील.

अमळनेरसह राज्यभर सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या रमेश लंकेश्वर, राजेंद्र चौधरी, प्रा. राजेंद्र वैद्य, दिनेश संकलेचा, दिनेश वाल्हे, गुलाब शिंगाणे, उदय कापुरे, प्रेम लोंढे, मेहतर हनिफ उर्फ अजित शेख, जगदीश तावडे या दिवंगत कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्र सेवा दल, छात्रभारती विद्यार्थी संघटना, अंधश्रध्दा निर्मुलन समिती यांचे वतीने विवेक जागर व्याख्यान आयोजिलेले आहे. व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!