डी.आर.कन्या शाळेची ती माजी विद्यार्थिनी असल्याने साहजिकच शाळेची प्रतिष्ठा ऊंचावली

अमळनेर : येथील कु.भावना जितेंद्र झाबक सी.ए. परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. डी.आर.कन्या शाळेची ती माजी विद्यार्थिनी असून एस.एस.सी ला तिने ९३ टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. पुणे येथून बी.एम.सी.सी. महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ती स्व. शांतीलालजी माणकलालजी झाबक यांची नात तर व्यापारी सेना शहर आघाडीचे अध्यक्ष तथा अरिहंत फर्निचर चे संचालक जितेंद्र शांतीलालजी झाबक यांची कन्या आहे. या यशात तिला झाबक परिवारचे सहकार्य तर मुथ्था अँड लाहोटी फर्म, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. डी.आर.कन्या शाळेची ती माजी विद्यार्थिनी असल्याने साहजिकच शाळेची प्रतिष्ठा ऊंचावली आहे.