
अमळनेर : भरारी बहुउद्देशिय संस्था, जळगाव आयोजित बहिणाबाई महोत्सवात तालुक्यातील पातोंडा परिसर विकास मंच ला नुकतेच विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. जळगाव येथे नुकताच सागर पार्कला कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाचे आपण देणे लागतो हा उद्देश समोर ठेवून पातोंडा परिसर विकास मंचने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेऊन भरारी बहुउद्देशिय संस्थेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचचे सर्व पदाधिकारी व सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक महोत्सवास उपस्थित होते.