अमळनेर : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंती निमित्त काल ता.२३ रोजी शहरासह ग्रामीण भागात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी शिवसेना व महाआघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने शिवसेना व महाआघाडी चे पदाधिकारी यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे, बिस्कीटे वाटप करण्यात आले. धुळे रोडवरील विजय मारोती मंदिर तसेच शिवाजीनगर प्रभाग क्र.१५ व पैलाड चोपडा नाका परिसरातील स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका जवळ महाआरती करण्यात आली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख प्रताप शिंपी, तालुका संघटक संजय कौतिक पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ संदानशिव, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पो.कॉ.शरद पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक श्याम पाटील, राजू फाफोरेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विक्रांत पाटील, व्यापारी सेनेचे जितेंद्र झाबक, डॉ.शशिकांत सोनार, महिला आघाडीच्या संगीता शिंदे, मनिषा परब, उज्वला कदम, शिवसेना पदाधिकारी नितीन निळे, जीवन पवार, शिवकुमार पाटील, चंद्रशेखर पाटील, नाना ठाकोर, देवेंद्र देशमुख, युवा सेनेचे श्रीकांत पाटील, चंद्रशेखर भावसार, रामचंद्र परब, गजानन भामरे, बोरसे टेलर, रमा पाटील, महेंद्र कदम, विजाऊ नवल पाटील, जगदीश आठवले, भरत जाधव, पी.एस.पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

