माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
अमळनेर : येथील प्रभाग क्र.१४ मध्ये सप्तश्रृंगी कॉलनीच्या बोर्डाजवळ (मुंदडा पार्क व भैय्याभाऊ बडगुजर यांच्या गँरेज समोरच्या मुख्यरस्त्यांवर) आणि भालेराव नगर व सुनंदा पार्कच्या मुख्य चौफुलीवर रात्रीच्या वेळी अंधारात मुलींची छेड काढणे, महिलांच्या सोन्याच्या वस्तू चोरणे इ. सारखे अनुचित प्रकार घडत असत. तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार, अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील व रवि पाटील यांच्या प्रयत्नांतून दोन्ही ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले असून त्यांचे लोकार्पण माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी रवि पाटील, प्रकाशभाऊ मुंदडा, कपिल पाटील (म.पोलीस), अमोल पाटील, महेंद्र पाटील (मा. सरपंच शिरुड), भैय्याभाऊ साळुंखे, डॉ.युवराज पाटील, महाजन सर, गुलाबराव पाटील, प्रशांत वंजारी सर, अमोल दुसाणे, तुषार बाविस्कर, कैलास पाटील सर, नितीन पाटील, सचिन अहिरे, मनिष जाधव, प्रफुल्ल संदानशिव, शिंगाणे सर, जाधव सर, सागर विसपुते, योगेंद्र बाविस्कर, दिलीप कोळी, मनोज पाटील, सागर पवार, नितीन बडगुजर, मयूर पाटील, अमृत पाटील, सागर पाटील, राहुल सातपुते, किशोर आप्पा, संदीप पाटील, कैलास बागूल सर, किशोर देवरे सर, किशोर शिंपी, निलेश पाटील, सुभाष पाटील, डॉ.दीपक पाटील, विजय पाटील, जितेन्द्र पवार आदी उपस्थित होते.

