अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये आज ता.२५ रोजी मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मतदार दिवसाचे महत्व विशद केले.
ते म्हणाले की, २५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात मतदार दिवस म्हणून साजरा होत आहे. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व काय आहे ? उमेदवार आपल्या एका मतामुळे विजयी होऊ शकतो तसा पराभवही होवू शकतो म्हणून जनतेला लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क मिळालेला आहे. तो हक्क आपण बजावला पाहिजेे. आपल्या घरातील कोणती व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेतली तर लोकशाही अधिक दृढ होवून लोकशाहीचे महत्त्व वाढेल. यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, एच.ओ. माळी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले.
