उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप
पारोळा : तालुक्यातील बाहुटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७१वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन तद्नंतर अजब ओंकार पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडेराव परशुराम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उपशिक्षक गोरख पाटील यांनी सामूहिक संविधान वाचन घेतले. उपशिक्षक राजेंद्र मनोरे व श्रीमती प्रियंका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बसविलेले ‘संदेसे आते है’ या गीतावर शाळेच्या मुलामुलींनी लेझीम नृत्य सादर केले. सदरहू लेझिम नृत्य गावकऱ्यांसाठी आकर्षणाचा व कौतुकाचा विषय ठरला. तद्नंतर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी दुर्गेश पाटील, दर्शन शिंदे, अंजली भिल, गोपिका पाटील, आरती भिल आदी विद्यार्थ्यांना सरपंच सौ.हिराबाई भटूलाल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.त्यानंतर कै.काळू दलपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री.काशिनाथ काळू पाटील यांनी शाळेस स्मार्ट अँड्रॉइड टि.व्ही. सप्रेम भेट दिला. कमलेश धर्मराज पाटील, उपसरपंच यांनी मोठा डेस्क व शाळेच्या कंपाउंडसाठी रु.२१ हजार देणगी दिली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडेराव शिंदे यांनी रु.१५,५०० देणगी दिली. माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे यांनी काँम्प्युटर टेबल व खुर्ची तर विमा प्रतिनीधी विलास पाटील यांनी शाळेस छोटा डेस्क भेट दिला. यावेळी शाळेस रंगमंच बांधून देण्याचे जाहीर करणारे उपशिक्षक श्री.राजेंद्र शिवाजी मनोरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आबा पाटील, भटूलाल पाटील, संजय पाटील, सोपान देसले, अंगणवाडी सेविका निलिमा पाटील, मायाबाई पाटील, बेबाबाई कोळी, आशाबाई पाटील, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप पवार, किशोर पाटील, संतोष पाटील, किरण देसले यांनी परिश्रम घेतले. राजेंद्र मनोरे यांनी सुत्रसंचालन तर गोरख पाटील यांनी आभार मानले.

