सरस्वती विद्या मंदिर शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

अमळनेर : येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रणजित शिंदे होते.
श्री शिंदे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. यावेळी उपशिक्षक परशुराम गांगुर्डे यांनी नेताजींच्या जीवन कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. यावेळी शाळेेेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाषणे केलीत. उपशिक्षिका सौ.संगिता पाटील यांनी प्रास्ताविक केले तर ऋषीकेश महाळपूरकर यांनी आभार मानले. यावेळी उपशिक्षक आनंदा पाटील, सौ.गीतांजली पाटील, धर्मा धनगर, सौ.संध्या ढबु आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!