अमळनेर शाखेत विमा व्यवसायात बाबुलाल पाटील यांच्या यशाबद्दल एलआयसी कडून सपत्निक सत्कार

अमळनेर : कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर ध्येय निश्चित करुन, त्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केल्यास यश मिळल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन एलआयसी नाशिक विभागाचे सेल्स मॅनेजर प्रदीप जोशी यांनी केले. ते अमळनेर येथील एलआयसी तर्फे नुकत्याच आयोजिलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. विमा प्रतिनिधी बाबुलाल यशवंत पाटील यांनी विमा व्यवसायात जागतिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत मानला जाणारा एम डी आर टी (USA) 2019 हा बहुमान अमळनेर शाखेत प्रथम मिळविल्याने त्यांचा जाहीर सत्काराचे आयोजन अमळनेर एलआयसी तर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ.बी.एस.पाटील, सुरत येथील प्रतिष्ठीत बिल्डर युवराज पाटील, देशदूत चे संपादक अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला, शाखाधिकारी महेंद्र ठाकुर, सेवानिवृत्त विकास अधिकारी गणेश रावतोळे, विकासाधिकारी संजय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबुलाल पाटील यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
आमदार स्मिता वाघ यांनी एल आय सी चे महत्त्व सांगून अडचणीतून मार्ग शोधण्याचे काम आणि जीवन जगण्याचे साधन म्हणून एलआयसी करीत असल्याचे सांगीतले. विकासाधिकारी गणेश रावतोळे यांनी ‘जीवन के साथ आणि जीवन के बाद’ अशी एकमेव साथ देणारी एलआयसी ही परिवाराचे सुख दुखाची साथीदार असल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील म्हणाले की, बाबुलाल पाटील यांनी केलेले एलआयसी चे काम हजारो कुटुंबातील सदस्यांना संकट काळात नक्कीच कामात येईल. देशदूतचे संपादक अनिल पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा झाली आहे. स्पर्धेत तोच व्यक्ती टिकू शकतो, जो ध्येय वेडा होतो. जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, नंदुरबार येथील विकासाधिकारी हिरालाल महाजन, शाखाधिकारी महेंद्र ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले. विकास अधिकारी संजय शेटे यांनी प्रास्ताविकात बाबुलाल पाटील यांनी केलेले एम डी आर टी (USA)चे ध्येय सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार संजय पाटील यांनी मानले.
यावेळी उपसरपंच मुरलीधर महाजन, पिंटू राजपूत, प्रा.अशोक पवार, महेंद्र बोरसे, सचिन पाटील, मुख्तार खाटीक, भागवत पाटील, जी.टी.टाक, धुळे येथील एलआयसी चे अनिल बेदमुथा, गं.का.सोनवणे, अँड.एस.आर.पाटील, अरुण चौधरी, अशोक चौधरी, दिलीप पाटील, प्रवीण माळी, सुदाम चौधरी, प्रा.सुरेश महाजन, कृष्णा पाटील, उपशाखाधिकारी वानखेडे, अहिरराव साहेब, किरण महाजन, काशीनाथ महाजन, नगराज महाजन, सुकलाल महाजन, तुषार झेंडे, आर. बी.पाटील, अजय रोडगे, नितिन पाटील, शहर व ग्रामीण पत्रकार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एलआयसी चे कर्मचारी, प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.