ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे हिवाळी क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन

अमळनेर : येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे हिवाळी क्रिडा महोत्सवाचे नुुुुुकतेच उद्घाटन झाले. वैद्यकिय अधिकारी डाॅ.गिरीष गोसावी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.पी.एस.पाटील, संस्थेचे सचिव प्रा.शाम पाटील, तालुका क्रिडा संयोजक एस.पी.वाघ यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी स्कुलचे प्राचार्य विकास चौधरी, डी.एड. चे प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी, क्रिडा शिक्षक व्ही.एन सूर्यवंशी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने गेल्या सात वर्षांपासुन हिवाळी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात शाळेतील ग्रीन हाऊस, रेड हाऊस, ब्लु हाऊस, सॅफराॅन हाऊस चे विद्यार्थी सहभागी होऊन त्यांच्यात सामने रंगत असतात.

या क्रिडा महोत्सवात बास्केटबाॅल, व्हाॅलिबाॅल, स्केटिंग, कराटे, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, बुद्धिबळ, रनिंग, जंपींग, स्किपिंग, टेबल टेनिस, क्रिकेट, टग ऑफ वाॅर, स्टीक डेमोस्ट्रेशन ह्या खेळांचे आयोजन करण्यात आले असुन विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत. मनोज बिऱ्हाडे यांनी सुत्रसंचालन केले तर केदार देशमुख यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!