अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

अमळनेर : महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे नुकतेच अमळनेर येथे उद्घाटन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील हे तिसरे ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र आहे. यावेळी व्यासपीठावर अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ, न.पा.चे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड, राज्य परिषदेचे सदस्य विकास महाजन, न.पा.चे प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, नायब तहसीलदार श्री बावणे, स्थानिक अध्यक्ष मकसूदभाई बोहरी, तालुका संघटक राजेंद्र सुतार, सचिव विजय शुक्ल, उपाध्यक्षा ॲड.भारती अग्रवाल, जिल्हा महिला सदस्या लिना मराठे (जळगाव) हे उपस्थित होते

तहसीलदार मिलिंद वाघ यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास महाजन यांनी ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे कार्य व केंद्रात आलेल्या समस्यांचे निवारण कसे करावे ? याबाबत मार्गदर्शन केले. जळगाव जिल्ह्यात असे तिसरे ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्र सुरू झालेले आहे. याआधी भुसावळ,एरंडोल आणि आता अमळनेर या ठिकाणी सेवा केंद्र सुरू झाले आहे. अमळनेर ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष मकसूदभाई बोहरी यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करीत आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमळनेर शाखेने जळगाव जिल्ह्याचा अभ्यास वर्ग मोठ्या प्रमाणावर आयोजित केला होता. त्या अभ्यास वर्गात ३५० चे वर कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रभर अमळनेरचे हे रोल मॉडेल गाजलेले होते. त्याचप्रमाणे न.पा.चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत नगरपालिकेच्या वतीने संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. नगरपरिषदेच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या तक्रार निवारण करण्याचे काम नेहमीच करीत असतो. ग्राहक पंचायतीच्या वतीने आलेल्या तक्रार अर्जांचा सहानुभूतीने विचार करून १०० % तक्रार निवारण करू असेही ते म्हणाले. सदरचे ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र हे दर शुक्रवार व शनिवार रोजी दुपारी चार ते सहा या दरम्यान मकसूद बोहरी यांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स, कोर्टासमोर, अमळनेर येथे सुरू राहील. तरी नागरिकांनी आपले तक्रारी अर्ज लेखी स्वरूपात कार्यालयात जमा करावे. या सेवा केंद्रामुळे अमळनेरकरांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या सदोष वस्तू व सेवा बद्दल काही तक्रारी असल्यास त्या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्रामार्फत निवारण करण्याचे प्रयत्न मंच करणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकसूदभाई बोहरी यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र सुतार यांनी तर आभार प्रदर्शन वनश्री अमृतकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सचिव विजय शुक्ल व करुणा सोनार यांनी करून दिला. कार्यक्रमास योगेश पाने, ताहा बुकवाला, खदीर सादिक, महेश कोठावदे, अरविंद मुठे, सतीश मुंडके, दिनेश रेजा, जयंतीलाल वानखेडे, मधुकर सोनार, अनिल वाणी, राजेंद्र अग्रवाल, पत्रकार पांडुरंग पाटील, उमेश धनराळे, गुरूनामल बठेजा, ॲड. भारती अग्रवाल, लीना मराठे, करूणा सोनार, वनश्री अमृतकर, आरती रेजा, कपिल मुठे, अंजु ढवळे, ॲड. उर्मिला अग्रवाल, विजया जैन, लता दुसाने, अरुणा अलई आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!