अमळनेर : येथील मुंदडा नगर मधील अल्पावधीतच प्रतिशेगाव म्हणून नावारूपाला आलेल्या संत गजानन महाराज मंदिरात दि.१५ फेब्रुवारी प्रकट दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर.बी पवार यांनी सांगितले. दि.१३ फेब्रुवारी संत गजानन महाराज मंदिराच्या तिसरा वर्धापन दिनी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
दि.१५ रोजी प्रगट दिवसा निमित्ताने सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पादुका पूजन व १० ते ११ वाजेपर्यंत २१ वा अध्यायाचे सामूहिक वाचन ११ वाजेला महाआरती व त्या नंतर महाप्रसादाचे वाटप ठेवण्यात आले आहे. यासाठी संस्थानचे अध्यक्ष श्री आर.बी.पवार, सौ.ज्योती पवार, व गजानन भक्त गोपाल पाटील, आनंद पाटील, प्रविण पवार, चेतन उपासनी, नितीन भावे, रघुनाथ पाटील, मोहीत पवार, श्रीकृष्ण चव्हाण, विजय येवले, पंकज येवले, महिला सरला चव्हाण, इंदिरा येवले, शोभा कोळी, मंगला धनगर, वंदना भारती, मंगला पाटील, बबीता पवार मेहनत घेत आहेत. तरी आयोजकांच्या वतीने अमळनेर तालुक्यातील गजानन भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेे.