
अमळनेर : येथील प्रतापनगर मधील रहिवाशी भारतीय सैन्यदलाचे जितेंद्र अरुण सोनवणे यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यांच्या राहत्या घरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्यदलात जितेंद्र सोनवणे यांनी १७ वर्षे प्रामाणिक सेवा बजावली आहे.
यानिमित्त रविवारी जितेंद्र सोनवणे यांचे रेल्वे स्टेशनवर आगमन झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक, सैनिक व यमुनाई प्रतिष्ठान यांचे तर्फे शाल, पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबियांत झालेला आनंद अविस्मरणीय होता. सैनिक जितेंद्र सोनवणे यांनी कृतज्ञता व्यक्त करतांना आपली विधवा आई, मोठे बंधु, बहीण, ज्येष्ठ मंडळीचे चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेतले. सेवानिवृत्ती सत्काराचे चित्र पालटून कृतज्ञता सोहळ्यात रूपांतर केले.
कुटुंबियांसोबतची क्षणचित्रे…

समाज कल्याणाची ज्योत कायम तेवत ठेवत जितेंद्र सोनवणे समाजापुढे नवा आदर्श निर्माण करतील असा आशावाद यमुनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. त्यांचा दहा वर्षाचा मुलगा चि. स्पर्श यानेही इंग्रजीतून आपले मनोगत व्यक्त केले. याबद्दल त्याचे उपस्थितांकडून कौतुक झाले. याप्रसंगी सतीष सोनवणे, श्रीराम बच्छाव, मधुकर पाटील, सागर पाटील, प्रकाश पाटील, मंगेश पाटील, विजय बोरसे, राजू बिऱ्हाडे, संजय सूर्यवंशी, नातेवाईक, मित्र परिवार आदी उपस्थित होते.


