बाहुटे येथील जि.प. प्राथमिक शाळेत ‘बालरंग’ कार्यक्रम रंगला

पारोळा : तालुक्यातील बाहुटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १४ फेब्रुवारीला घेण्यात आलेला आजवरच्या ऐतिहासिक पहिला “बालरंग”वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या कार्यक्रमात लहान बालकांपासून माताभगिनी, तरुण, आबालवृद्धांपर्यत सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सार्वे केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद मिस्त्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ.हिराबाई भटूलाल पाटील, उपसरपंच कमलेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडेराव शिंदे, उपाध्यक्ष आबा पाटील होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेस ‘डिजिटल वर्गासाठी’ रुपये ५१ हजार देणारे देणगीदार माजी सरपंच चंद्रकला प्रकाश पाटील आणि बाहुटे गावासाठी ‘शवपेटी’ देणारे देणगीदार किसान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक युवराज यशवंतराव पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मोरया मोरया’ या गीताने विघ्नहर्ता गणपती बाप्पास कार्यक्रम सुकर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकडे घातले. तद्नंतर लल्लाती भंडार,शंकरा रे शंकरा, गलतीसे मिस्टेक, चिटियाँ कलयाँ, संविधाच्या पहिल्या पानावर, माँ तुझे सलाम, एकच राजा इथे जन्मला आदी देशभक्तीपर गीते, बालगीते, चित्रपट गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य व कलाविष्कार सादर केलेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये “शेतकरी आत्महत्या थांबवा, देश वाचवा” ही नाटीका, “बाहुलीनृत्य” आणि घोड्यावर बसुन आलेले शिवाजी महाराज या कार्यक्रमांना उपस्थितांनी कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात गावकऱ्यांकडून बक्षीसांचा वर्षाव झाला. यावेळी उपसरपंच कमलेश पाटील यांचेकडून फोटो व व्हिडीओ शुटींग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडेराव शिंदे यांचेकडून स्टेज डेकोरेशन, तर पंकज सुभाष पाटील यांचेकडून साऊंड सर्विसचा खर्च दिल्याबद्दल उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास पाटील, संदिप पाटील, सुरेश पाटील, खुशाल भिल, सुवर्णा पाटील, सविता पाटील, सुनिता पाटील, संगिता इनाईत, तिरोणाबाई पाटील यांचेमार्फत आभारपर सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत पाटील- माजी सरपंच, अरूण पाटील, भटूलाल पाटील, के.के.पाटील, संजय पाटील, श्रीमती पुष्पा पाटील, सौ.कुसूमबाई भिल,माजी सरपंच, विश्वास पाटील, संजय पाटील, अतुल कदमबांडे, महादु कोळी, रविंद्र शिंदे, भागवतराव पाटील, रमेश इनाईत, किशोर पाटील, युवराज पाटील, रोहित इनाईत, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. याशिवाय राजेंद्र शिंदे सर, प्रविण पवार सर, राजु पाटील सर, सचिन देशमुख सर, नरेंद्र पाटील लोणी, दिपक गिरासे सर, सौ.अश्विनी मनोरे, सौ.योगिता पाटील, कु.रुचिता शिंदे, कु.संजिवनी मनोरे आदि बाहुटे शाळेवर प्रेम करणारे बाहेरील गावाचे शिक्षक, आप्तेष्ट यावेळी आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक गोरख पाटील यांनी तर व्यवस्थापन राजेंद्र मनोरे यांनी केले. सुत्रसंचालन प्रियंका पाटील व राजेंद्र मनोरे यांनी केले. आभार संदीप पवार यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीत झाल्यावर कार्यक्रम संपला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!