अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात प्रतापियन्स प्रबोधिनी, करियर कौन्सिलिंग सेंटर आणि वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र प्रशाळातर्फे सोमवार (ता.२ मार्च) पासून व्यावहारिक कौशल्ये, स्पर्धात्मक कौशल्ये यावर तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवारी (ता.२) प्रथम सत्रात दुपारी बाराला खा.शि. मंडळाचे संचालक निरज अग्रवाल हे ‘स्पर्धात्मक कौशल्यातून करियरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर द्वितीय सत्रात दुपारी १.१५ वाजता वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रमुख तथा प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.ओ. माळी यांचे ‘वाचन व लेखन कौशल्ये’ या विषयावर मार्गदर्शन होईल. तृतीय सत्रात दुपारी २.३० ला प्रा.डॉ. वाय.व्ही.तोरवणे यांचे ‘लेखन स्पर्धा’ या विषयावर तर चतुर्थ सत्रात दुपारी ३.४५ ला प्रा.डी.एम.मराठे यांचे ‘कॉमर्स चॅम्पियन मुख्य परीक्षा-२०२०’ या विषयावर मार्गदर्शन होईल.
मंगळवारी (ता.३) प्रथम सत्रात दुपारी बाराला प्रा.उषा माधवानी ‘व्यावहारिक कौशल्यांची ओळख’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर द्वितीय सत्रात दुपारी १.१५ ला प्रा. तेजस्विनी पाटील ह्या ‘ वेळेचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तृतीय सत्रात दुपारी २.३० ला वावडे येथील माध्यमिक शिक्षक निरंजन पेंढारे हे ‘नेतृत्व-पुढाकार कौशल्ये’ या विषयावर तर चतुर्थ सत्रात ३.४५ ला आर्मी स्कूलचे शिक्षक प्रा.शरद भिका पाटील हे ‘ संभाषण कौशल्ये’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
बुधवारी (ता.४) प्रथम सत्रात दुपारी बाराला प्रा.राहुल वाय पाटील ‘ सादरीकरण व पी पी टी’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर द्वितीय सत्रात दुपारी १.१५ ला प्रा.कपिल आर. मनोरे ‘परिचय पत्र लेखन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तृतीय सत्रात दुपारी २.३० ला प्रतापिय प्रेरणा प्रबोधनीचे समन्वयक स्वर्णदीप राजपूत ‘मुलाखत कौशल्ये’ या विषयावर तर चतुर्थ सत्रात दुपारी ३.४५ ला आर्मी स्कूल चे शिक्षक तथा सकाळचे पत्रकार उमेश काटे हे ‘समूह- गट चर्चा’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ ज्योती राणे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एस.ओ. माळी यांनी केले आहे.