राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसच्या वतीने अमळनेर येथे युवा सन्मान पुरस्काराचे वितरण

अमळनेर : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसच्या वतीने संपूर्ण राज्यभर युवा सन्मान पुरस्काराचे वितरण केले जात आहे. त्या अनुषंगाने अमळनेर येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने नुकतेच जी.एस.हायस्कूल मधील आय.एम.ए. सभागृहात युवा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय, सामाजिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता, क्रिडा अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना मान्यवरांचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देेवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनीभाऊ मानकर होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने युवा सन्मान पुरस्कारासाठी ज्या पुरस्कारार्थींची निवड केली ती योग्य असून हे युवा पुरस्कारार्थी म्हणजे समाजासाठी विविध क्षेत्रातील आयकॉन आहेत असे मत आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले. पुरस्कारार्थींमध्ये, राजकीय : विक्रांत पाटील, सामाजिक : भारती पाटील, उद्योग : जितेंद्र कटारिया, आश्विन जैन, कृषी : निलेश धनगर, दिपक बागुल, गोपाल बागुल, पत्रकारिता : किरण पाटील, चेतन राजपूत, चंद्रकांत पाटील, क्रिडा : सायली बडगुजर, रेहान शेख यांचा समावेश होता. सदर सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!